नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी सरकारकडून काय घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता. केंद्र सरकार यावेळी महिला व बालविकास, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य आदी क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शेती आणि महिलांच्या विकासासाठी अनेक योजनांत केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच सरकार काही नव्या योजनांची घोषणा करणार का? हे देखील पाहावे लागेल.
‘या’ घोषणा होण्याची शक्यता-
-नव्या करधोरणानुसार केंद्र सरकार 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची शक्यता
-15 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी 25% कर होण्याची चिन्ह, सध्या 30 टक्के कर द्यावा लागतो.
-एक्ससाईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची चिन्ह
-पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता; सध्या वार्षिक 6 हजार दिले जातात, ही रक्कम 12 हजार होण्याची शक्यता
-रोजगाराशी संबंधित तरतुदी वाढवल्या जाऊ शकतात, एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण सरकारतर्फे आणलं जाण्याची शक्यता
-आरोग्य सेवांवरचा खर्च वाढवला जाण्याची शक्यता गृह कर्जावर मिळणाऱ्या व्याज सवलतीची रक्कम 2 लाख रुपये आहे, जी 5 लाख रुपये केली जाण्याची शक्यता
-कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित पार्टवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला गेला तर मोबाईल स्वस्त होऊ शकतात.