Published On : Tue, Aug 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

अखेर नरेंद्र मोदी-शरद पवार एकाच मंचावर, एकमेकांना स्मीतहास्य करत केले हस्तांदोलन !

Advertisement

पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर येताच मान्यवरांना हात जोडून नमस्कार केला. मात्र, यावेळी, मोदींनी शरद पवारांसमोर येताच त्यांच्या हातात हात दिला. शरद पवारांनीही स्मीतहास्य करत मोदींची पाठ थोपटली.

महाराष्ट्रात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाराचा आरोप केला होता. . मात्र, शरद पवारांनी आपला भाजपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. पण, आज पुण्यातील या पुरस्कार सोहळ्यात मोदींसमवेत व्यासपीठावर एकत्र आल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे.

Gold Rate
12 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,30,300 /-
Gold 22 KT ₹ 1,21,100 /-
Silver/Kg ₹ 1,92,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आजच्या सोहळ्यातील मोदी-पवार भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी आणि पवार यांच्यात दिलखुलास संवाद झाल्याचं दिसून येत आहे. तसेच, शरद पवारांनी मोदींचा हात हाती घेऊन, त्यांची पाठही थोपटल्याचे दिसून येत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळाचे उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

Advertisement
Advertisement