Published On : Thu, Jul 18th, 2019

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Advertisement

कामठी:-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या पिली हवेली तसेच गुजरी बाजार चौकात कामठी नगर परिषद ची अधिकृत बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणात कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या वतीने कनिष्ठ लिपिक प्रदीप भोकरे यांनी स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीनुसार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या दोघावर एम आर टी पी ऍक्ट 52, 53, 54 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल केलेल्या दोन लोकांमध्ये वसंता गणेश नागदेवे वय 60 वर्षे रा पिली हवेली चौक कामठी तसेच मो खालिद मो वकील रा गुजरी बाजार कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पिली हवेली चौकात वसंता गणेश नागदेवें यांनी 2016 मध्ये स्वतःच्या घराचे कामठी नगर परिषद ची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करीत असल्याची मो असलम मो इमाम खान व इतरांनी 9 ऑगस्ट 2016 ला कामठी नगर परोषद ला तक्रार केली होती या संदर्भात नगर परिषद च्या वतीने नोटीस बजावून काम थांबविण्याचे बजाविले तसेच वारंवार नोटीस सुद्धा बजावले तसेच 28 नोव्हेंबर 2016 ला सुद्धा नोटीस दिले

मात्र नगर परिषद च्या पाठविलेल्या नोटीस ची कुठलेही गांभीर्य लक्षात न घेता बिनधास्त पणे बांधकाम सुरू ठेवत दुमजली बांधकाम केले तसेच गुजरी बाजार चौकात फ्रेंड्स कमर्शियल कॉम्प्लेक्स चे सचिव मो खालिद मो वकील यांनी सुद्धा नगर परिषद ची बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याने यासंदर्भात तक्रारकर्ते मुज्जफर सईद अफरोज यांनी 15 फेब्रुवारी 2018 ला केलेल्या तक्रारीनुसार नगर परिषद ने दिलेल्या नोटीस तसेच मोका चौकशीत जैसे थे स्थिती ठेवून अनधिकृत बांधकाम केल्याने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दोन्ही अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांवर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होण्याच्या प्रकरणाला गती आल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यानुसार या प्रकारची यशस्वी कारवाही मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनार्थ रचना सहाययक रोहन डोने, कनिष्ठ लिपिक प्रदीप भोकरे, कनिष्ठ लिपिक रुपेश जैस्वाल यांनी केली.

संदीप कांबळे कामठी