| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 12th, 2018

  पंधराव्या वित्त आयोगाकडून राज्याला अधिकाधिक सहाय्य मिळावे – मुख्यमंत्री फडणवीस

  मुंबई:– महाराष्ट्राचे देशाच्या विकासात महत्त्वपुर्ण योगदान आहे. त्यामुळे केद्रांकडून महाराष्ट्राला वित्त पुरवठयाबाबत अधिकाधिक सहाय्य मिळावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. केंद्रीय १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंह यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते.

  यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.के.जैन, वंदना कृष्णा आदी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने देशाच्या विकासात नेहमीच महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. राज्य विकासाच्या विविध आघाड्यांवर उपक्रमशील राहिले आहे. शेती, शेतकरी आणि शहरी पायाभूत क्षेत्रात प्रगतिशील असणाऱ्या राज्याला केंद्रीय वित्त आयोगाकडून अधिकाधिक सहाय्य मिळावे.

  यावेळी झालेल्या चर्चेत श्री.सिंह यांना राज्याच्या विविध नाविन्यपुर्ण योजना आणि उपक्रमांबाबतही माहिती देण्यात आली.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145