Published On : Sun, Jun 30th, 2019

आदिवासी गोवारी समाज संघटना व्दारे विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटना रामटेक विधानसभा श्रेत्रा व्दारे समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात साजरा करण्यात आला.आदिवासी गोवारी समाजाने शिक्षण क्षेत्र, समाजकारण, राजकारणात सक्रीय सहभाग घेतला तरच समाजाच्या विविध समस्या निकाली काढुन समाज प्रगती पथाकडे वाटचाल करू शकतो. करिता नवीन पिढीला उच्च शिक्षित करून समाजाचे शिस्तबद्ध संघटन निर्माण करून आधुनिक संघर्ष समाज बांधवांनी एकत्र येऊन करावाच लागेल. असे भावनिक मार्गदर्शन महिला व बाल कल्याण सभापती सौ पुष्पाताई वाघाडे हयानी केले.

आदिवासी गोवारी समाज संघटना रामटेक विधानसभा जि.नागपुर व्दारे रविवार दि.३० जुलै २०१९ ला दुपारी १ वाजता समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे श्री मनोहरराव राउत सहाय्य क अभियंता एम एस ई बी रामटेक यांच्या अध्यक्षेत सौ पुष्पाताई वाघाडे सभापती महिला व बाल कल्याण समिती यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्या त आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी मा शेखरभाऊ लसुंते संपादक आदिवासी वार्ता, सत्कारमुर्ती लेखक मा. शेषराव नेवारे गुरूजी, मा. संतोषजी भोयर विदर्भ अध्यक्ष आ गो स संघटना, मा नारायणराव कावरे अध्यक्ष आ गो स संघटना नागपुर ग्रामीण आदी मान्यवरां नी उपस्थितीत राहुन समाजाच्या उन्नती करिता मार्गदर्शन करून रामटेक विधानसभा क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी च्या ७२ गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्य वरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सत्कारमुर्ती मा.शेषरावजी नेवारे गुरूजी यांचा गोंडवानातील आदिवासी गोवारी (कोपाल) ग्रंथ लिहिला बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सोहळ्यास परिसरातील समाज बांधव व गुणवंत विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आंनद सहारे हयानी तर आभार प्रदर्शन जिवन राऊत यांनी केले. यशस्वीते करिता संघटनेचे नेवालाल सहारे, ईश्वर गजबे, सरपंच नितेश राऊत, भगवान भोंडे, नंदु कोहळे, चंदु घोनांडे, राकेश भोंडे, राजु कावरे, भोला वागरे, देवेंद्र नेवारे, राजकुमार कावरे, विनोद कोहळे, पाडुरंग राऊत, शेखर कोहळे, संतोष बोरजवाडे, अश्विन राऊत, राहुल बोटरे, रूपेश राऊत, श्याम शेंद्रे, विलास लसुंते, चंद्रशेखर बोटरे, मधुकर नेवारे, दामोदर वगारे, छगन राऊत, अंकुश वाघाडे, भास्कर राऊत, दिलीप येसनसुरे, रविंद्र कोहळे, अरविंद नेवारे, शंकर राऊत, अर्जुन देव्हारे, राधेश्याम चचाणे, प्रदीप भोंडे, अनिल ठाकरे, रामदास वाघाडे, गेंदलाल बोपचे, प्रकाश सोनवने, राहुल ठाकरे, संदीप कवरे, तुलसीदास कोहळे, विनोद नेवारे, मुकेश सोनवाने, दुर्गेश राऊत, पाडुरंग वाघाडे, प्रकाश नेवारे, राजु कुपाले, नितेश नेवारे, शेषराव कोहळे सह समाज बांधवानी सहकार्य केले.