नागपूर : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगरच्या वतीने शिक्षक सहकारी बँकेत भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. अनिलजी सोले, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष मा. धर्मपाल मेश्राम, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सुभाष पारधी, रामभाऊ अंबुलकर, दिलीप हाथीवेड, भैयासाहेब भीगाने, सुधीर जांभुळकर, सतीश सिरसावन, राहुल ऊके, शंकर मेश्राम, अनंत जगनीत, मोहिनी रामटेके, हिमांशु पारधी, इंद्रजीत वासनिक, महेंद्र प्रधान यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगरच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.