Published On : Fri, Jul 5th, 2019

भाजप अनु. जाती मोर्चातर्फे प्रवीण दटके यांचा सत्कार

Advertisement

नागपूर: भारतीय जनता पार्टीच्या नागपूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांचे भारतीय जनता पार्टी नागपूर शहर अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष. धर्मपाल मेश्राम यांनी नवनियुक्त भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार केला. यावेळी बोलताना श्री. प्रवीण दटके म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नागपुरातील संघठन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील. समाजातील प्रत्येक घटकाचा पक्षात सन्मान होईल. तळागळातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येईल. कार्यकर्ते प्रामाणिकपणे पक्षाचे कार्य करीत असतात. या कार्यकर्त्यांमधील नेतृत्वालाही योग्य संधी देण्यात येईल असे म्हणत त्यांनी सत्काराबद्दल अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष. धर्मपाल मेश्राम म्हणाले, श्री. प्रवीण दटके यांच्या रूपाने भाजपला नव्या दमाचा युवा नेता मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप नागपूर शहरात अधिक बलशाली, सामथ्यशाली होईल. त्यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक उंच झेप घेईल. युवा नेतृत्वाचा सन्मान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्कारप्रसंगी अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी शहर महामंत्री मनीष मेश्राम, राहुल मेंढे, विशाल लारोकर यांच्यासह इतर पदाधिकारी शंकर मेश्राम, विजय फुलसुंगे, रोहन चांदेकर, संदीप लेले, विजय गजभिये, जगदीश बामनेट, शरद पारधी, अमित गांजरे, प्रभाकर मेश्राम, अरविंद शेंडे, इंद्रजित वासनिक, अजय बागडे, राहुल झांबरे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement