Published On : Fri, Apr 27th, 2018

मनपाच्या २८ सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या २८ सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार शुक्रवार (ता.२७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून निगम अधीक्षक राजन काळे, सहायक अधीक्षक (जीपीएफ)दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक (सामान्य प्रशासन विभाग) मनोज कर्णिक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना शाल, श्रीफळ, धनादेश, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. यामध्ये व्हि.डी.सूर्यवंशी (आरोग्य विभाग), डी.के.धोटे (सामान्य प्रशासन विभाग), सुभाष लाडे (शिक्षण विभाग), एस.एस.कनाडे, ए.जी.बगले, एस.टी.हुसेन, श्रीराम भोयर, गीता डांगोर (सर्व आरोग्य विभाग), पी.बी.शर्मा (ग्रंथालय विभाग), मेहजबीन जहाँगीर खाँ, कल्पना धोपाडे, चंदा मोझरकर, मोरेश्वर वरघने, छाया कोलारकर, रूक्मिनी वर्मा, रश्मी भिडे, श्यामराव डांगाले (सर्व शिक्षण विभाग), एम.ए.बिजवार, शंकर आकरे, मोहम्मद शकील सिराज, कृपाचार्य सोमकुवर (सर्व कर व कर आकाराणी विभाग), एस.चौधरी, संजय चौधरी (सर्व लोककर्म विभाग), अशोक मसराम (प्रकाश विभाग), गोविंद यादव, मनोहर बोधनकर, चंद्रभागा नारायणे (सर्व जलप्रदाय विभाग) यांचा समावेश आहे.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचा-यांपैकी सहायक शिक्षिका रश्मी भिडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस यांनी केले. कार्यक्रमाला माजी अंदाजपत्रक अधिकारी गिरिश उपासनी, दिलीप तांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.