Published On : Thu, Nov 30th, 2017

मनपाच्या १९ सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार

Retire Employee, NMC, Nagpur
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या १९ सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार गुरूवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडला. यावेळी जीपीएफ अधीक्षक दत्तात्रय डहाके, निगम अधीक्षक राजन काळे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, मनपा कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, मनोज कर्णिक प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचा-यांना मान्यवरांच्या हस्ते तुळशीचे रोपटे, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये कनिष्ठ निरिक्षक एन.पी.शेंडे, एम.एल.पसरेकर, मोहरीर एम.एम. खोडे, लिडींग फायरमन एम.एम.पांडे, ए.जे.जाधव, मध्याध्यापिका शोभा मेहर, सहा.शिक्षिका पुष्पमाला जनबंधू, शोभा सनकत, मजदूर सरोज मेश्राम, अनिरूद्ध सोमकुंवर, मुरलीधर बोकडे, लोककर्म विभागाचे यशोदा गौरखेड, चपराशी माला बसू, भाऊराव वासुलकर, अशोक रोठोड, कर निरिक्षक महेंद्र काळे, सफाई मजदूर राजन तांबे, नथ्थुजी शंकर ढोके, लोककर्म विभागाचे दुर्गा कराडे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे संचालन अशोक कोल्हटकर तर आभारप्रदर्शन राजेश हाथीबेड यांनी मानले. कार्यक्रमाला दिलीप तांदळे, विशाल शेवारे, धनराज मेंढेकर, केशव कोठे प्रामुख्याने उपस्थित होते.