Published On : Wed, Nov 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील पारडीमध्ये भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

Advertisement

नागपूर : पारडी परिसरात सोमवारी रात्री वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये हरषवर्धन गोपाल बोहरा (४५) आणि दीपेन ओमप्रकाश सोनोने (२४, दोघे रा. साईनगर, पारडी ) यांचा समावेश आहे. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास ९.१५ वाजता हे दोघे बजाज प्लेटिना (क्र. MH-49-BF-3211) या दुचाकीवरून बारदवारीकडे जात असताना, आर्या यार्डजवळ वेगाने आणि निष्काळजीपणे आलेल्या ट्रकने (क्र. RJ-11-GB-1752) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Gold Rate
06Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,300 /-
Gold 22 KT ₹ 1,11,900 /-
Silver/Kg ₹ 1,48,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी हरषवर्धन बोहरा यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी दीपेन सोनोने याचा उपचारादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

या घटनेत दीपेनचा भाऊ कोमल ओमप्रकाश सोनोने (२८) यांनी तक्रार दाखल केली असून, पारडी पोलिस स्टेशनचे पीएसआय चालुर्कर यांनी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४, १८४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement