Published On : Sat, Sep 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

FASTag वाहनधारकांसाठी मोठी बातमी; नितीन गडकरींच्या ‘OneTag’ सुविधेमुळे बँक बदलणे झाले सोपे

Advertisement

नवी दिल्ली : FASTag वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठी सुविधा सुरू केली आहे. आता FASTagची बँक बदलण्यासाठी वाहनावर लावलेला जुना FASTag काढण्याची किंवा नवीन FASTag घेण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘OneTag’ या नव्या सुविधेचा शुभारंभ केला आहे.

‘OneTag’ सुविधा नेमकी काय आहे?
‘OneTag’ ही सुविधा Indian Highways Management Company Limited (IHMCL) आणि National Payments Corporation of India (NPCI) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. या सुविधेमुळे वाहनधारकांना त्यांचा सध्याचा FASTag कायम ठेवून संबंधित FASTagची बँक बदलता येणार आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यापूर्वी FASTagची बँक बदलायची असल्यास जुना FASTag बंद करावा लागत होता. त्यानंतर नवीन बँकेकडून पुन्हा FASTag घेऊन तो वाहनावर बसवावा लागत असे. या प्रक्रियेमुळे वाहनधारकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होते. ‘OneTag’मुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

‘Highway Yatra’ ॲपद्वारे होणार बँक बदल-
सध्या ‘OneTag’ सुविधा NHAIच्या Highway Yatra मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. FASTag पोर्टेबिलिटीची संपूर्ण प्रक्रिया ॲपवरून करता येणार आहे.

Advertisement

प्रथम ग्राहकाची पात्रता तपासली जाईल. त्यानंतर सुरक्षित पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ग्राहकाची संमती घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या पसंतीची नवीन बँक निवडता येईल. बँक बदलाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन बँकेकडून ग्राहकाचे ऑनबोर्डिंग केले जाईल.विशेष म्हणजे, पोर्टिंगनंतर FASTagचा Tag ID आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक (Vehicle Registration Number) बदलणार नाही. त्यामुळे वाहनावर आधीपासून लावलेला FASTagच पुढे वापरता येणार आहे.

जुन्या आणि नवीन बँकेची जबाबदारी काय?
FASTag बँक बदलताना जुन्या बँकेकडे जुन्या वॉलेटशी संबंधित बाबी हाताळण्याची जबाबदारी असेल. यामध्ये ग्राहकाची पडताळणी, वॉलेटमधील शिल्लक रक्कम, परतावा, प्रलंबित व्यवहार आणि इतर संबंधित बाबींचा समावेश असेल. पोर्टेबिलिटीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाने निवडलेल्या नवीन बँकेकडून ऑनबोर्डिंग केले जाईल आणि त्यानंतर FASTagशी संबंधित सेवा नवीन बँकेमार्फत उपलब्ध होतील.

FASTag वापरकर्त्यांना काय फायदा होणार?
‘OneTag’ सुविधेमुळे FASTag वापरणाऱ्या वाहनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत.

बँक बदलण्यासाठी नवीन FASTag घेण्याची गरज राहणार नाही.
वाहनावर लावलेला विद्यमान FASTag कायम ठेवता येईल.
वारंवार FASTag बदलण्याचा त्रास कमी होईल.
नवीन FASTagच्या पुनर्मुद्रणाचा खर्च वाचू शकतो.
FASTagच्या शिपिंग आणि संबंधित खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना FASTagसाठी बँक निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल.
एकूणच, ‘OneTag’मुळे FASTag बँक पोर्टेबिलिटीची प्रक्रिया अधिक सोपी, सोयीस्कर आणि ग्राहककेंद्री होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.