Published On : Mon, Aug 3rd, 2020

शेतक-यांना आता गाव नमुना आठ अ मिळणार ऑनलाईन – महसूलमंत्री

Advertisement

नागपूर, : शेतकऱ्यांना सातबाऱ्यासोबतच गाव नमुना ‘आठ अ’ आता ऑनलाईन मिळणार असून महसूल दिनापासूनच या कामाची अंमलबजावणी सुरु झाल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितले.

कोविडबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर आज महसूल मंत्र्यांच्या हस्ते बचतभवन येथे प्रातिनिधीक स्वरुपात चेतन निघोट, मधुकर उमरेडकर, प्रशांत चिखले, पुरुषोत्तम फटींग, अनिल सेलकर, गंगाधर गभणे, गजानन ठाकरे, नामदेव मोरे, अन्नपुर्णाबाई तळजकार, हेमराज मोरे, महादेव ठाकरे या शेतकऱ्यांना गावनमुना आठ अ वितरीत करण्यात आले. तसेच शहीद जवान रत्नाकर कळंबे यांच्या पत्नी डॉ. अर्चना कळंबे व शहीद तेजराव दंदी यांच्या पत्नी इंदुमती दंदी यांना दोन हेक्टर जमीन प्रदान करण्याबाबतचे प्रमाणपत्र ही श्री. थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत 18 हजार कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली असून शासनाने गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले. कोविड संकटाच्या काळात स्थलांतरित नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement