Published On : Fri, Sep 24th, 2021

ई-पीक पाहणी करून शेतकरी आत्मनिर्भर होणार-जिल्हाधिकारी आर विमला

कामठी :-जे शेतकरी मोबाईल ऍप द्वारे स्वता ई पीक पाहणी करणार नाहीत त्यांच्या पिकाची नोंद सात बारा वर होऊ शकणार नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, शेतीमाल खरेदी-विक्री करणे, कर्ज माफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकते तरी कामठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी ऐपद्वारे आपल्या पिकाचो नोंद करण्याचे आव्हान करीत ई पीक पाहणी करून शेतकरी आत्मनिर्भर होणार असल्याचे मनोगत नागपूर जिल्हाधिकारी आर विमला यांनी काल खैरी गावाला दिलेल्या अकस्मात भेटीत व्यक्त केले. तसेच डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण शेतकरी स्वता मोबाईल एपद्वारे ई पीक नोंदणी करणेबाबत एसडीओ ,तहसिलदार, बीडीओ , कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शीत करण्याचे आव्हान सुदधा केले.

शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल वर प्ले स्टोअर मधून एप घ्यावे.”सदर ऐप हे अत्यंत सरळ व सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत असल्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी एपच्या माध्यमातून स्वता आपल्या खरीप हंगामातील पिकाची नोंद करावी व पिकाचा फोटो काढून तो ऐप वर अपलोड करावा.नोंद करताच अपलोड केलेली माहितो ही संबंधित तलाठी लॉग इन उपलब्ध होणार नंतर तलाठी यांनी मान्यता दिल्या नंतर त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या सात बारा वर तात्काळ होणार असल्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे.

Advertisement

याप्रसंगी एसडीओ श्याम मदणुरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, बीडीओ अंशुजा गराटे, तालुका कृषी अधिकारो मंजुषा राऊत, कृषी विस्तार अधिकारी शुभांगी कामडी, खैरी ग्रा प सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, उपसरपंच, ग्रा प सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यासह ग्रामस्थ व शेतकरी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement