नागपूर : असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव एम्प्लॉईज् ऑफ इंडिया -एपीईआय नागपूर शाखेच्या वतीने नागपूर वनविभागातील वनसंरक्षक संजय दहिवले (भावसे) हे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्याने व रेखा भवरे, सहायक पोलीस आयुक्त ह्यांची मुंबई येथे बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
संजय दहिवले यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक वनीकरण , वनजमिनिवरील अतिक्रमण हटविणे, वनसंरक्षण यासारखे अनेक उपक्रम राबविले, गडचिरोलीतील पारडी या गावात मोठ्या प्रमाणात वनशेतीला प्रोत्साहन दिल्यामुळे गावाचा कायापालट त्यांनी केला . ते असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव एम्प्लाइज या संघटनेचे सक्रिय सदस्य असून करोना काळात पहिल्या ताळेबंदीच्या वेळी स्थलांतरित मजुरांना मदत करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली.
रेखा भवरे ह्या सुद्धा सामाजिक दायित्व जोपासत असलेल्या पोलीस अधिकारी असून त्या मागील तीन वर्ष नागपूर पोलीस येथे कार्यरत होत्या. त्या यवतमाळ जिल्हातील बेलोरा गावातील असून त्या मागील तीस वर्ष मुंबई पोलीस मध्ये सेवा देत आहेत व पदोन्नती नंतर त्याची बदली नागपूर येथे झाली होती व सतत तीन वर्ष त्यांनी नागपूर पोलीसात विविध पदावर सेवा बजावली .
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात ग़डचिरोली वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर ( भावसे) यांनी अध्यक्ष पदावरुन बोलतांना संजय दहिवले यांनी सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य संघटनेच्या माध्यमातून समाज सेवा करावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोवीडच्या दुसऱ्या लाटेमध्ये समाजातील गोरगरीब तसेच संघटनेच्या सदस्यांना फोनद्वारे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. प्रशांत बागडे यांचाही शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
एपीईआय संघटनेच्या विद्यार्थी मदत समितीचे अध्यक्ष अरुण तसेच मीडिया सेलच्या सचिव तेजस्विनी गवई यांचा सुद्धा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागपूर शाखेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला बानाईचे कुलदीप रामटेके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विजय गोडबोले भावसे, प्रवीण बडगे भावसे, प्रा. कुंभारे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा विलास तेलगोटे यानी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. भावना वानखेडे, राजन तलमले, मोहन गजभिये ,संतोष वानखेडे, प्रतिमा पथाडे, धनराज बडोले, उमेश पाटील, रिमोद खरोळे, शिल्पा फुलझेले, स्वप्नील गवई, अॅड.अर्चना नंदा ह्यांनी परिश्रम घेतले.