Published On : Tue, Sep 21st, 2021

श्री गणेश ला काली मंदिर घाट पावन कन्हान नदी पात्रात शांततेत व आंनदाने निरोप

काली मंदिर कन्हान नदी पात्रात ढिवर समाज संघटनेच्या जिवन रक्षक पथका व्दारे श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विसर्जन.

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गणेश महोत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात येतो. परंतु राज्या सह नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे सावट असल्याने शहरातील परिसरात शासनाच्या नियमाचे पालन करूनच श्री गणेश उत्सव साजरा करून कन्हान -पिपरी नगरपरिषदे द्वारे काली मंदिर कन्हान नदी काठावर श्री विसर्जनाची व्यवस्था करून कडक पोलीस बंदोबस्तात ढिवर समाज संघटनेच्या जिवन रक्षक पथकाने दोन दिवस कन्हान परिसर व कामठी येथील घरघुती व सार्व जनिक श्री गणेश मुर्तीचे शिस्तबध्य विर्सजन करून श्री गणेशा ला शांततेत व आंनदाने ” पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात निरोप देण्यात आला.

Advertisement

कन्हान शहरात व परिसरात शुक्रवार (दि.१०) सप्टेंबर ला श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी बाप्पाची घरो घरी ६१४ व सार्वजनिक शहर ४ आणि ग्रामिण १४ श्री गणेशाची स्थापना करून सकाळी व सायंकाळी होणा ऱ्या आरती शिवाय कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करता कोरोना काळाती ल शासनाच्या नियमाचे पालन करूनच शहरात व परिसरात गणेश उत्सव साजरा करण्यात आला. जिल्ह्यात व शहरात गेल्या काही दिवसापासुन सतत पाऊस होत असल्याने कन्हाननदी दुथडी भरुन वाहत असल्याने रविवार (दि.१९) व सोमवार (दि.२०) सप्टेंबर दोन दिवस काली मंदिर सत्रापुर कन्हान नदी काठावर नगरपरिषद द्वारे गणेश विसर्जनाकरिता विधृत (लाईटस), मंडप, लॉडीस स्पिकर व संपुर्ण व्यवस्था करण्यात आल्याने कडक पोलीस बंदोबस्तात ढिवर समाज संघटनचे जिवन रक्षक पथकाने कन्हान शहर परिसर व कामठी येथील नारिकांच्या हजारोच्या संख्येत घरघुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे काली मंदिर घाटाच्या कन्हान नदी पात्रात शिस्तबध्य विर्सजन करून श्री गणेशा ला आंनदाने शांततेत निरोप देण्यात आला.

यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आय जी मा. छेरिंग डोरजे, एस पी ओला साहेब, डि वाय एस पी बागवान हयानी भेट देऊन विसर्जन परिस्थिती ची पाहणी केली. याप्रसंगी नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, अनिल ठाकरे, व सर्व नगरसेवक, नगरसेविकांनी उपस्थिती दर्शवली. कन्हान पोलीस स्टेशन चे पोनि संजय काळे, गुन्हे पोनि यशवंत कदम, उपपोनि अमितकुमार आत्राम, वाहतुक पोलीस, दंगा नियंत्रक पथक व महिला, पुरूष पोलीस कर्मचा-यांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.

ढिवर समाज संघटन अध्यक्ष सुतेश मारबते, बालचंद बोंदरे, गितेश मोहने, मनोज मेश्राम, श्रीकांत मानकर महिला प्रतिनिधी रेखाताई भोयर, कुंदाताई कांबळे, जिवन सुरक्षा पथक प्रमुख शिवराम खंडाते, मोहन वाहिले, राजु मारबते, बंडुजी केवट, उमेश मेश्राम, धर्मराज खंटाते, विनोद गोंडाणे, रवि केवट, सचिन खंडाते, विजय गोंडाणे, संजय नारायण मेश्राम, सुधाकर सहारे, संजय नागोजी मेश्राम, प्रमोद गोंडाणे, मनोज दुधबावने, विक्की हावरे, रामचंद्र भोयर, हेमराज मेश्राम, धनराज बावने आदीने पावन कन्हान नदी पात्रात शिस्तबध्य श्री गणेश मुर्ती विसर्जन करण्याची कामगिरी बजावली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement