Published On : Tue, Sep 1st, 2020

कामठी तालुक्यात गणरायाला निरोप

Advertisement

मिरवणूक न काढता व गर्दी न करता केले ‘श्री’च्या मूर्तीचे विसर्जन

कामठी:-भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या विघनहर्त्या गणरायाची 10 दिवस मनोभावाणे पूजन करून आज 1 सप्टेंबर मंगळवार ला अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पाला भविकाकडून साश्रु नयनाने निरोप देण्यात आला.ढोलताशे व मिरवणूक न काढता यावर्षी ‘श्री ‘मूर्तीचे विसर्जन करण्यात आले तसेच हा दहा दिवसीय गणेशोत्सव अतिशय साधेपनाणे साजरा करण्यात आला.

कोरोनाची पाश्वरभूमी लक्षात घेता इतर सण उत्सवा प्रमाणे गणेशोत्सव हा महत्वाचा सण यावेळी अतिशय साधेपणाने शासनाच्या नियमांचे पालन करोत साजरा करण्यात आला .या दहा दिवसीय गणेशोत्सव दरम्यान कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह घराघरात श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती दरम्यान कुठलेही लाऊडस्पीकर न वाजविता व कोणत्याही प्रकारचे डेकोरेशन न करता या दहा दिवसीय गणेशोत्सव पर्वाची सांगता आज अनंत चतुर्दशीला करण्यात आली .

श्री गणेश विसर्जन मिरवणूक न काढता गणेश मूर्तीचे विसर्जन करणे आवश्यक असल्याने खाजगी घराघरात स्थापन केलेल्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन कामठी नगर परिषद च्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले ज्यामध्ये गंज के बालाजी मंदिर,क हुतात्मा स्मारक, लोहिया लॉन, संघ मैदान, दिवाण मंदिर, मोंढा, हनुमान मंदिर, नगर परिषद कार्यालय जुनी इमारत,नवीन इमारत तसेच निंबाजी अखाडा परिसरात केलेल्या कृत्रिम तलावात श्री चे विसर्जन करण्यात आले.तर यावर्षी कोरोनाच्या पाश्वरभूमीवर बाप्पाना निरोप देण्यासाठी प्रशासनाने मार्गदर्शीत केलेल्या प्रशास्कोय सूचनांचे पालन करताना सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह घराघरात स्थापित केलेल्या श्रो गणेश मूर्तीच्या भक्तांना आपल्या उत्साहावर आळा घालावा लागला.

संदीप कांबळे कामठी