भाजपा कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या

murder

नागपूर: नागपूरकरांची आजची पहाट हादरवणारी उडवणारी ठरली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही थरकाप उडवणारी घटना नागपुरातील दिघोरी येथील आहे.

कमलाकर पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे.

दरम्यान, कमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. कमलाकर पोहनकर आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली.

ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.