Published On : Wed, Dec 5th, 2018

नागपुरात बनावट हॉलमार्कचे दागिने जप्त

नागपूर : भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) नागपूर विभागाने सूचनेच्या आधारावर कारवाई करून बनावट हॉलमार्क दागिने जप्त केले आणि संचालकाला नोटीस जारी करण्यात आला. विभागाने विशेष मोहिमेंतर्गत गोंदिया येथील विविध ज्वेलरी शोरुमची तपासणी केली. त्यात दुर्गा येथील शोरुममध्ये बनावट हॉलमार्कचे दागिने आढळून आले.

Advertisement

बीएसआयचे नागपूर विभागीय प्रमुख आर.पी. मिश्रा यांनी सांगितले की, ग्राहकांची फसवणूक करून बनावट हॉलमार्क दागिन्यांची विक्री करणे चुकीचे आहे. या अंतर्गत दागिन्यांच्या शोरुमची तपासणी करण्यात येते. बनावट हॉलमार्क दागिन्यांसह संचालकाकडे विक्रीचा परवाना नव्हता. कारवाईदरम्यान सर्व दागिने जप्त कण्यत आले. ग्राहकांना शुद्ध सोन्याचे आणि हॉलमार्कचे दागिने असल्याचे सांगून तो ग्राहकांकडून जास्त पैसे आकारित होता.

Advertisement

मिश्रा म्हणाले, यापूर्वी बीआयएसच्यावतीने नागपुरातही काही ज्वेलर्सवर अशीच कारवाई करून बनावट हॉलमार्कचे दागिने जप्त केले होते. नागपुरात जवळपास चार हजार सराफांची दुकाने आहेत. पण बीएसआचा परवाना घेणाऱ्यांची संख्या केवळ १५० च्या आसपास आहे. विभागाच्या अधिकाºयांनी सराफांना बीएसआयचा परवाना घेण्याची विनंती केली आहे. शिवाय विभागाने या संदर्भात जागरुकता कार्यक्रम घेतले आहेत. त्यानंतरही केवळ १०० जणांनी परवाना घेतला. पण सराफा व्यापाºयांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच अल्प आहे. परवाना शुल्कही कमी आहे. त्यानंतरही भीतीपोटी व्यापारी पुढे येत नाही. सराफांनी पुढे येऊन परवाना घ्यावा, असे आवाहन मिश्रा यांनी केले. हॉलमार्कचा परवाना घेतल्यास व्यवसायात पारदर्शकता येईल आणि ग्राहकांनाही शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील, असे ते म्हणाले.

Advertisement

भारतीय मानक ब्युरोअंतर्गत एलपीजी सिलिंडर, एलपीजी व्हॉल्व, रेग्युलेअर, विविध दुग्धजन्स पदार्थ, इलेक्ट्रिक केबल, पॅकेजिंग ड्रिकिंग वॉटर, स्टील, सिमेंट आदींसह ११६ उत्पादनांसाठी बीएसआयचा परवाना घेणे बंधनकारक आहे. अशा प्रकरणांमध्ये बीआयएस कायदा-२०१६ मधील तरतूदीनुसार एक ते पाच लाखांपर्यंत दंड अथवा एक वर्ष कारावास होऊ शकतो.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement