Published On : Wed, Mar 27th, 2024

महाविकास आघाडीत बिघाडी ; प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीची घोषणा करत विदर्भातून उमेदवार केले जाहीर

Advertisement

नागपूर : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेससह मित्रपक्षांच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांनी मोठा धक्का दिला. आंबेडकर यांनी नव्या आघाडीची घोषणा केली आहे. आघाडीची घोषणा करताच आंबेडकर यांनी विदर्भातून उमेदवार घोषित केले आहे.

अकोला इथं पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ही घोषणा केली. येत्या लोकसभा निवडणुकीत विविध समाजाला प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीपासून अंतर राखण्याची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी काही उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली. आंबेडकर यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला. सांगलीत प्रकाश शेंडगे हे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल, असेही आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले.

दरम्यान रामटेक लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसचे किशोर गजभिये हे वंचित बहुजन आघाडी करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार-

भंडारा-गोंदिया – संजय गजानन केवट
गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मढावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलढाणा – वसंत राजाराम मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – कुमारी प्राजक्ता तारकेश्वर टिल्लेवार
वर्धा – प्रा. राजेंद्र साळुंखे
यवतमाळ वाशिम – खिमसिंग प्रतापराव पवार
नागपूर – काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
सांगली – प्रकाश शेंडगे उभे राहिल्यास पाठिंबा
रामटेक -किशोर गजभिये