आरेग्यमंत्री राजेश टोपेंचा पुतळा फुंकला.
दि २५ व २६ सप्टें. रोजी आरोग्य विभागाची वर्ग ‘क’ आणी वर्ग ‘ड’ ची होणारी परीक्षा आधल्या दिवशी रात्रीच्या वेळी रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय राज्य सरकारने केला आहे. याच्या विरोधात आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे मेडिकल चौक येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा पुतळा फुंकुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
गोर गरीब विद्यार्थी आपले पैसे खर्च करून परीक्षा केंद्राला पोहचले अश्या विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी व पुढील दोन दिवसांत परीक्षेची तारीख निश्चित करून प्रसिद्ध करावी, अन्यथा भाजयुमोतर्फे राज्य भऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या सर्व गलथान कारभाराला जबाबदार असणारे आरोग्य मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली.
आंदोलन प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार, शहर महामंत्री दिपांशु लिंगायत व सचिन करारे, संपर्क मंत्री मनिष मेश्राम यांच्या नेतृत्वात झाले.
यावेळी प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग कदम, देवदत्त डेहणकर, रितेश राहाटे, विशाल केचे, मंडळ अध्यक्ष अमर धरमारे, सन्नी राऊत,पंकज सोनकर, सचिन सावरकर,संकेत कुकडे, इशान जैन, पियुष बोइनवार, सौरभ पराशर, उदय मिश्रा, सांदिपन शुक्ला, शैलेश नेताम, कमलेश शाहु, गौरव हरडे, सचिन मांडले, अथर्व त्रिवेदी, पवन खंडेलवाल, सुरज दुबे,गोलु बोरकर, एजाज शेख, विक्की पांडे, आकाश भेदे, शुभम खेरीकर, गुड्डु पांडे, हरिष निमजे, आनंद गुप्ता, आशिष तिवारी, अश्विन निनजे, प्रतिक पाचकवडे, विकी रामटेके, मोहित घायवट, अभिजीत गावंडे, गोविंदा काटेकर, गैरव पाठक दिपेश यादव, मोहित भिवंकर, प्रणव फुलझले, पवन महाकाळकर, शिवम् पांढरिपांडे, राहुल सावड़िया, गोविंद गाड़गिलवार, प्रशांतसिंग बघेल, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.