Published On : Tue, Nov 5th, 2019

खासगी बसकंपन्यांकडून प्रवाशांची सर्रास लुट

प्रादेशिक परिवहन महामंडळ झोपेत

नागपुर – राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश महासचिव श्री नागेश देडमुठे यांच्या नेतृत्वात खासगी बस कंपन्यांविरोधात परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त मा.निर्मला देवी यांना निवेदन दिले.

दिवाळीच्या दिवसांत खासगी बस कंपन्यांकडून सामान्य जनतेची प्रवाशांची सर्रास लुट होत आहे नागपूर-पुणे , नागपूर-नाशिक , मुंबई , हेद्राबाद मार्गावर धावणाऱ्या खासगी बस कंपन्यांकडून 3 ते 4 पट भाडे वाढवून 800 ते 1000 रूपयांची बस भाडे 3600 ते 4000 पर्यंत वाढवून जनतेची खुलेआम आर्थिक लुट करीत असून याकडे सरकारी प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत

तसेच पी.यू.सी देणारे वाहनांच्या तपासणीवीना 40 ते 100 रुपयांत खासगी वाहनांना पी.यु.सी सर्टिफिकेट जारी करीत आहेत अश्याप्रकारे प्रवाश्यांच्या मजबूरीचा फ़ायदा उचलून जनतेच्या आरोग्याशी आणि प्रवाशांची आर्थिक लुट खासगी बस कंपन्यांचे संचालक करीत आहेत

यावर निर्बंध लावण्यासाठी , प्रवाशांची आर्थिक लुट थांबवण्यासाठी खासगी बस कंपन्याच्या संचालकांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी राष्ट्रवादी विद्यार्थी ची मागणी आहे, जर लवकरात लवकर यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील अशी चेतावनी देण्यात आली, याप्रसंगी प्रामुख्याने विद्यार्थी प्रदेश महासचिव राहुल कामडे , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रवि पराते , मनीष वजरे , विजय देडमुठे, रजत अतकरे, निखिल कळंबे , प्रज्वल बोबडे , अक्षय बोबडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.