Published On : Mon, Jun 28th, 2021

महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी व्यापक वसुली मोहीम राबवावी : खंडाईत

Advertisement

नागपूर – वीज ग्राहकांकडील बिलाची थकबाकी वाढत असल्यामुळे महावितरणची आर्थिकस्थिति बिकट झाली आहे.त्यामुळे महावितरणच्या आर्थिक स्थिरतेसाठी सर्वच प्रवर्गातील ग्राहकांकडील वीज बिलाची वसुली आवश्यक असून त्यासाठी व्यापक मोहीम राबवावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी नागपूर परिमंडलाच्या आढावा बैठकीत दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही महावितरणने ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज सेवा दिली. परंतु याकाळात घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक आणि कृषी वीज ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिकस्थिती खालावली आहे. अशा स्थितीत ज्या वीज ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे, अशा ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी व्यापक व नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात यावी.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच वीज बिल भरण्याबाबत वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा,असे आदेश संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वसुली मोहीम राबविताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे ग्राहकांची आर्थिकस्थिती बिकट असल्याची जाणीव महावितरणला आहे. परंतु सध्याच्या अवघड परिस्थितीत ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे भरून महावितरणला सहकार्य न केल्यास महावितरणला दैनंदिन खर्च भागविणेही कठीण होईल. वीज ग्राहकांनी या वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी आणि त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करावे असे निर्देशही संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

या बैठकीत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, वर्धा मंडलचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे तसेच नागपूर परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते,लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement