नागपूर: शहरातील बेलतरोडी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला हॉटेल ओयो सिसॉर्ट, स्टे इन (मेश्राम ले आउट, बेलतरोडी रोड) येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर धाड टाकली. तेथून एक महिलेची सुटका करण्यात आली. पोलिसांनी हॉटेल मालक सुरज गजानन निकम ( ३६, हुडकेश्वर), मॅनेजर बीओम कैलास पटेल (३० वर्षे,पिपरीया, जि. होशंगाबाद, म.प्र.) यांच्यासह दलाल अविनाशकुमार लक्ष्मण पांडे (२४, झारखंड), रॉकी राजेंद्र अग्रवाल ( ३०, मनिष नगर, बेलतरोडी), आशिषकुमार नागदेव यादव ( २७, बेलतरोडी) व नितीनकुमार रोहितास पांडे (२४, जयप्रकाश नगर) यांना ताब्यात घेतले.
आरोपी गरजू मुली, महिलांना पैशांचे आमीष दाखवत देहव्यापार करवून घेता होते.यादरम्यान त्यांच्या ताब्यातून ८ मोबाईल, कारसह १७,३७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा छडा पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, महेंद्र थोटे, लक्ष्मण चौरे, शेषराव राऊत, अश्विन मांगे, समिर शेख, कुणाल मसराम, कमलेश क्षीरसागर, आरती चव्हाण, पुनम शेंडे यांच्या पथकाने लगावला.