Published On : Tue, Nov 20th, 2018

वर्ध्यातील लष्करी तळावर भीषण स्फोट, सहा जणांचा मृत्यू

Representational Pic

वर्धा: वर्ध्यातील पुलगाव परिसरातील लष्करी तळावर भीषण स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

तर अठरा जण जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या स्फोटाबाबत लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.