नागपूर : केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे संकल्पनेतून अजनी रेल्वे स्टेशनचा विस्तार योजनेला केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवी झेंडी दिली असून त्या दिशेने कार्यदेखील सुरु झाले आहे. अजनी रेल्वे स्टेशनच्या विकास योजनेच्या माध्यमातून नागपूर शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.
नागपूर शहराच्या पूर्व भागात इतवारी, कळमना व भांडेवाडी इत्यादी फार जुनी रेल्वे स्टेशन असून इतवारी रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे 500 एकर जागा अस्तित्वात आहे. या ठिकाणी पूर्वीपासून मालधक्के आहेत. परंतु सध्यास्थितीत या मालधक्याचा फारसा उपयोग नाही. या ठिकाणी मुबलक प्रमाणात रेल्वेची जागा उपलब्ध असल्यामुळे मोठे रेल्वे स्टेशन साकार होऊ शकते.
या भागात व्यापारपेठ व उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असून याचा फायदा व्यापारी वर्गासोबातच इतवारी, महाल या क्षेत्रातील नागरिकांना निश्चितपणे होईल. त्यामुळे अजनी रेल्वे स्टेशन विकास योजनेच्या धर्तीवर इतवारी रेल्वे स्टेशनचा विस्तार व कायापालट करावा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली असून तसे पत्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना दिले.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी त्वरित सज्ञान घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना लगेच पत्र पाठवून यासंदर्भात लगेच निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असे या पत्रात नमूद केले आहे.
टिप : दोन्ही पत्रांच्या प्रती सोबत संलग्न आहे.