Published On : Mon, May 18th, 2020

कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी केली पाणी पुरवठा केंद्राची पाहणी

नवेगाव खैरी येथून कन्हान नदीला ७० दलमी पाणी पुरवठा

नागपूर : शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये भेडवणा-या पाणी समस्येसंदर्भात सोमवारी (ता. १८) कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी कन्हान येथील पाणी पुरवठा केंद्राला भेट देउन पाहणी केली. शहरात भेडसावत असलेल्या पाणी समस्येबाबत पाणी पुरवठा केंद्रातील प्रत्यक्ष स्थितीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेविका सरीता कावरे, माजी नगरसेवक महेंद्र राउत, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कनिष्ठ अभियंता श्री. भस्मे, ओसीडब्ल्यूचे प्रवीण शरण, दिनेश अटाळकर आदी उपस्थित होते.

कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमधील रहिवासी भागात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. शहरातील पाण्याच्या समस्येबाबत गांभीर्य बाळगत कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी प्रत्यक्ष कन्हान नदीवरील पाणी पुरवठा केंद्राला भेट दिली.

पाणी समस्येमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जलसंपदा विभागाशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार नवेगाव खैरी येथील जलाशयातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्यात आले आहे. नवेगाव खैरी ते कन्हान नदी असा ४४ किमी अंतराचा प्रवाह असून कन्हान नदीत ते पाणी पोहोचायला ४८ तासाचा कालावधी लागणार आहे. पाण्याबाबत यावेळी संबंधित अधिका-यांकडूनही आढावा घेण्यात आला.

पाणी टंचाईमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नवेगाव खैरी येथून करण्यात आलेल्या पाणी पुरवठ्यामुळे लवकरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरात ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्या संदर्भात अडचणी येत आहेत त्या सर्व ठिकाणी तातडीने उपाययोजना करून तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश यावेळी कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी दिले. पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता संबंधीत अधिका-यांनी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिलेत.

Advertisement
Advertisement