नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजिगिरे यांच्यासह २३ मनपा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम गुरूवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निगम अधीक्षक मदन सुभेदार हे होते. यावेळी सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, दत्तात्रय डहाके, नितीन साकोरे प्रामुख्याने उपस्थित होते. निवृत्त कर्मचाऱ्यांना यावेळी शाल, श्रीफळ, धनादेश देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता एस.बी.जयस्वाल, उपअभियंता जे.एस. उमाळकर, राजस्व निरीक्षक एस.एम.काळे, कनिष्ठ निरिक्षक एम.जे.बिनेकर, कनिष्ठ लिपिक सुरेश वनवे, मोहरीर प्रभाकर गुबे, कर संग्राहक गंगाधर ढोबळे, सॅनिटरी इंस्पेक्टर आर.व्ही गायकवाड, सहायक ग्रंथपाल सी.व्ही.कुळकर्णी, अभियांत्रिकी सहायक पी.बी.थुटे, अशोक विरमलवार, रेजा कांता वानखेडे, चपराशी तारा ठाकरे, सहायक शिक्षक शरदचंद्र भारती, सहायक शिक्षक होमेश त्रिवेदी, सहायक शिक्षिका उषाकिरण दामले, तरला तु्म्पलवार, सुनिता झरबडे, सैय्यद जाफर अली, सफाई कामगार राजन बापुना बोरकर, शिला तुर्केल, मोरेश्वर रामटेके यांचा समावेश होता.
यावेळी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांपैकी प्रदीप राजगिरे आणि जे.एस. उमाळकर यांनी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.