Published On : Mon, Oct 25th, 2021
By Nagpur Today Nagpur News

रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ

Advertisement

– रुग्णालय प्रशासनात खळबळ
– वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

वर्धा – वर्धेच्या सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ माजलीय.सकाळदरम्यान हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला.बिबट्या दिसताच रुग्णालय परिसरात खळबळ माजलीय.रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रुग्णालयाचे दरवाजे आणि खिडक्या बंद करत वनविभागासह पोलिसांना माहिती दिली.

Gold Rate
29 May 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver/Kg 98,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच हा बिबट्या झाडावर बसला असल्याचे आढळले.काही वेळेतच कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावले.मात्र तो या परिसरतीलच नालीत शिरला.मागील अर्धा तासापासून वनविभागचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर रस्त्यालगत असलेल्या नालीतच त्याने आडोसा घेतल्याने रुग्णालय समोरचा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement