Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Oct 10th, 2020

  लाखांदूर येथे गांधी जयंती कार्यक्रम उत्साहात

  भंडारा : नेहरू युवा केंद्र भंडारा युवा आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत 2 ऑक्टोबर 2020 ला 151 वी गांधी जयंती चा कार्यक्रम सेवक वाघाये पाटील महाविद्यालय, लाखांदूर येथे आयोजित करण्यात आला. जग बदलायचं असेल तर आधी स्वत:ला बदला अशा विचारांना चालना देणाऱ्या महात्मा गांधीजींचा सर्वधर्म समभाव यावर विश्वास होता.

  या कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक विश्वपाल हजारे, प्राध्यापक एच. आर. मेश्राम, एम.जी. ढोबरे व लाखांदूर येथील राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुलभा कांबळे उपस्थित होते.

  या कार्यक्रमांमध्ये महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145