Published On : Sat, Nov 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बेपत्ता दहावीच्या मुलीचा मृतदेह पाण्याच्या खड्ड्यात आढळल्याने खळबळ !

Advertisement

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेहच पारडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळील खड्ड्यातील पाण्यात तरंगताना आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संचिता प्रमोद पाटील (वय १५, रा. आराधनानगर, बिडगाव) असे मृत मुलीचे नाव आहे.

माहितीनुसार,संचित ही इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती. संचिता मंगळवार २१ नोव्हेंबरला रात्री १२:३० वाजता घरी न दिसल्यामुळे नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. परंतु, ती कोठेच आढळली नाही.

Gold Rate
Apr 25 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अखेर नातेवाइकांनी वाठोडा पोलिस ठाण्यात कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजेच्या पूर्वी तिचा मृतदेह पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागेश्वरनगर रेल्वे क्रॉसिंग जवळील खड्ड्यातील पाण्यात तरंगताना दिसला. पोलिसांनी तिचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अंकिता पाण्याच्या खड्ड्यात पडली की तिचा घातपात करण्यात आला याचा शोध पारडी पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement