Published On : Wed, Feb 7th, 2018

‘म्हाडा’चा माजी उपायुक्त नितीश ठाकूरला यूएईमध्ये अटक

नवी दिल्ली : पैशांच्या अफरातफर प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेला ‘म्हाडा’चा माजी उपायुक्त नितीश ठाकूर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ठाकूरवर यूएईमध्ये कारवाई केल्याची माहिती काल अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

नितीश ठाकूरच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरु झाल्याचीही माहिती यूएई पोलिसांनी दिली आहे. 21 जानेवारीला ही कारवाई झाली होती.

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ईडीच्या विनंतीनंतर इंटरपोलने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. 2011 आणि 2012 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

2016 मध्ये महाराष्ट्र एसीबीने नितीश ठाकूरला अटक केली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या वर्षी नितीशचा भाऊ निलेश ठाकूरला ईडीने चौकशीसाठी अटक केली होती.

ठाकूरच्या पीआरएस एंटरप्रायझेसला शापूर्जी अँड पालनजी कंपनीने दिलेल्या 250 कोटींच्या अवैध ग्रॅटिफिकेशन्सबाबत आयकर विभाग चौकशी करत आहे का, असा प्रश्न शिव प्रताप शुक्लांना विचारण्यात आला होता. त्यावर, आयकर कायद्यातील तरतुदींनुसार करदात्यांची वैयक्तिक माहिती उघड करण्यास प्रतिबंध असल्याची माहिती शुक्लांनी दिली.

Advertisement