नागपूर: शहरात शुक्रवारी मध्यरात्री ढगफूटी सदृश पाऊस झाला. या पावसाने संपूर्ण शहराला झोडपले.यामुळे जनजीवन विस्कळित झाले. शहरात अनेक ठिकाणे पाण्याखाली आली. तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांनी धावपळ उडाली. इतकी नाही तर सर्वसामान्य झोपडपट्टीवासियांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. अगोदरच घरात आर्थिक तांगी सुरू होती आणि आता सर्व काही वाहून गेल्यामुळे आमचा वाली कोण ? कोण आमच्याकडे लक्ष देणार? आमच्या समस्या कोण सोडविणार असे प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना आता कोणाला मदत मागावी, असेही ते म्हणत आहेत, अशा भीषण परिस्थीतीत प्रशासनाकडून कोणते पाऊले उचलण्यात येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान येते ४८ तास नागपूरसाठी धोक्याचे असणार असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे