Published On : Sat, Apr 29th, 2017

श्वानांच्या प्रश्नावर सर्वांचे सहाकार्य असणे गरजेचे : महापौर

Advertisement

Nanda Jichkar
नागपूर:
शहरात श्वानांचा प्रश्न हा तीव्र झाला आहे. दर सहा महिन्यात श्वानांची संख्या ही चौपटीने वाढते. या प्रश्नावार वेळीच आळा घातला नाही तर पुढच्या पिढीला आपण हे शहर श्वानांचे शहर म्हणून भेट देऊ. त्यामुळेच श्वानांच्या प्रश्नावर नागपूर महानगरपालिकेला पशुप्रेमी संस्था, पशु चिकित्सक, खाजगी पशु चिकित्सक, पशुंसाठी औषधे निर्माण करणाऱ्या फॉर्मासिस्ट या सर्वांच्या सहकार्यांची गरज आहे असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर शहरात वाढलेल्या श्वानांच्या प्रश्नावर शनिवार दिनांक २९ रोजी मनपा मुख्याल्यातील आयुक्त कक्ष् जवळील सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

बैठकीला सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अपर आयुक्त डॉ.रामनाथ सोनवणे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता)डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते. बैठकीत अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली १२ जणांची चमू नियुक्त करण्यात आली. ही चमूपुढील आठ दिवसात श्वानांच्या प्रश्नावर कृतीअहवाल सादर करतील. पुढील बैठकीत शहरातील पशु वैद्यकीय चिकित्सक, खासगी पशु वैद्यकीय चिकित्सक, पशुंसाठी औषधे निर्माण करणाऱ्या फॉर्माअस्ट यांच्यासमोर हा कृती अहवाल मांडला जाईल व श्वानांच्या प्रश्नावरील उपाययोजनेवर प्रत्यक्ष सुरवात केली जाईल.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या चमूमध्ये डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. श्रीधर बुधे, डॉ. हेमंत जैन, डॉ. स्वप्नील नागमोते, डॉ. विजय घोगे, डॉ.कविता रतन, डॉ. आशीष होले, पशुप्रेमी संस्थांचे संचालक करिश्मा गिलानी, अपर्णा मोडक, अंकिता शहा,मनोहर खोरगडे व अंजली वैदार यांचा समावेश आहे.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आम्हाला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. श्वानांचा प्रश्नावर ताबडतोब उपाय करता येत नाही. मात्र या प्रश्नावर उपाययोजनेची सुरुवात करणे हे गरजेचे होते.आपण एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र आता आपल्याला निकालाकडे वळायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून श्वानांच्या प्रश्नावर तोडगा काढायचा आहे. श्वानांच्या प्रश्नावर मनपाला सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्या पाठीशी मनपा ठामपणे उभी राहणार असल्याचे महापौर म्हणाल्या. मनपाला या प्रश्नावर सहकार्य करणाऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास मनपा ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी रहील. ही मोहिम यशस्वीपणे कशी राबवायची यासाठी लवकरच डॉ. सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील चमू लवकरच कृती अहवाल सादर करेल.

याप्रसंगी बोलताना सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, हे शहर तुमचे आमचे सर्वांचे आहे. नागपूरची निवड स्मार्ट सिटीअंतर्गत झाली असताना आज या शहरात अंदाजे ९० हजाराच्या जवळपास मोकाट श्वान आहेत. दर पावसाळ्यात श्वानांची संख्या झपाट्याने वाढते. आताच जर या प्रश्नावर उपाययोजना केल्या नाही तर पुढे हे शहर श्वानांचे शहर म्हणूनच ओळखल्या जाईल. म्हणूनच येत्या जूनपासून मनपातर्फे सर्वांच्या सहकार्याने ४०-५० हजार श्वानांची जरी नसबंदी करण्यात यश मिळाले तरी नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. मनपाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला तुमच्या संकल्पना आणि सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याच्या चौकटीत सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येईल.

डॉ. सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील चमू तयार करणार कृतीआराखडा