Published On : Wed, Nov 17th, 2021
By Nagpur Today Nagpur News

बालकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे- गलगली

Advertisement

– कुर्ल्यात बालदिनी चित्रकला स्पर्धेचे भव्य आयोजन

मुम्बई – कुर्ला पश्चिम येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधिनी वाचनालयात बालदिनाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत पारितोषिक वितरण करताना आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की फक्त एक दिवसापुरता मर्यादित बालदिन साजरा न करता बालकांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका सीमंतिनी सदानंद खोपकर यांनी विविध सामाजिक विषय देऊन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी, मावळ मराठाचे संपादक सदानंद खोपकर, सामाजिक कार्यकर्ता विनोद साडविलकर, चाईल्ड हेल्प लाईनच्या शोभा आगाशे,
जितेंद्र चौगुले या मान्यवरांनी मुलांच्या शिक्षण, संरक्षण, आरोग्य व कला इ. महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी देवेश कांबळे, प्रणिल हवालदार, संग्राम खराडे, वेदांत प्रभाळे, अरिषा शेख, संचिता पवार, शार्दुल पवार, सिध्दी यादव, भक्ती आडिवरेकर, सुदेश घागरे, सारा गायकवाड, श्रुती कानसरे, बलराज सांडगे, प्रज्वल कदम, हिमांशु वर्मा, श्रुती साडविलकर इ.विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थींनी आपली मनोगत व्यक्त केले व विजेत्यांना अनिल गलगली यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमास गिरीश कटके, धनंजय पवार, अमिता शर्मा, चंद्रकांत खराडे, चंद्रकांत यादव, गणेश चिकणे, चारूदत्त पावसकर, सचिन पवार, संतोष वेंगुर्लेकर, अरूणा सावंत, ज्योती जोशी, रघुनाथ वाघमारे, डिम्पल छेडा, जयकिशन डुलगच, अम्मी पेणकर, विनोदकुमार यादव, रविंद्र आडिवरेकर इ.मान्यवरांची उपस्थिती लाभली. वाचनालयाचे व्यवस्थापक राजेंद्र गायकवाड़, सलीम शेख, मनोहर सांडगे, दशरथ सुर्यवंशी, गुस्ताअली इ.व्यवस्थापन यशस्वीपणे पार पाडले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद साडविलकर यांनी केले.

Advertisement
Advertisement