Published On : Mon, Mar 2nd, 2020

नागपूर महानगरपालिकेचा स्थापना दिवस संपन्न

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ६९ व्या स्थापना दिवसानिमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील हिरवळीवर महापौर श्री.संदीप जोशी व आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी प्रथम महापौर बॅरि.शेषराव वानखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त महेश मोरोणे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, आरोग्याधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहा.आयुक्त महेश धामेचा, कार्य. अभियंता अजय मानकर, अविनाश बारहाते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, डॉ. अतिक खान, सचिवालय सल्लागार हरिष दुबे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांचेसह विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेची स्थापना २ मार्च, १९५१ रोजी झाली. त्यावेळी श्री.जी.जी.देसाई दि. ०१-०३-१९५१ ते ०३-०७-१९५१ पावेतो प्रशासक व त्यानंतर दि ०४-०७-१९५१ ते १०-०८-१९५२ पावेतो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

बॅरि.शेषराव वानखेडे यांनी दि. २४-०७-१९५२ रोजी प्रथम महापौर म्हणून कार्यभार स्विकारला. ते १४-०१-१९५३ पावेतो महापौर पदी कार्यरत होते. त्यानंतर बॅरि.वानखेडे यांनी ९-०१-१९५४ ते १२.०५-१९५५ व १२-०५-१९५५ ते २४-०१-१९५६ याप्रमाणे सलग दोनवेळा महापौर पद भुषविले.

बॅरि.वानखेडे यांना शहराचे प्रथम महापौर तर त्यांची कन्या श्रीमती कुंदाताई विजयकर यांना दि.५-०२-१९९६ ते ९-०२-१९९९ पावेतो प्रथम महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला, पिता-पुत्रीने प्रथम महापौर पद भुषविणे हा म.न.पा.चे इतिहासात विलक्षण योगा-योग आहे.