Published On : Wed, Sep 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

फाउंटनमध्ये पाणी, घराघरात टंचाई; नागपूरच्या फुटाळा प्रकल्पावर पर्यावरणवाद्यांचा घणाघाती सवाल

नागपूर टुडे' संवाद कार्यक्रमात पर्यावरणवाद्यांचा हल्लाबोल
Advertisement

फाउंटनमध्ये पाणी, घराघरात टंचाई; नागपूरच्या फुटाळा प्रकल्पावर पर्यावरणवाद्यांचा घणाघाती सवाल

नागपूर : नागपूरची ओळख असलेल्या फुटाळा तलावाच्या सुशोभीकरण आणि संगीत कारंजे प्रकल्पावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्यानंतर आता कारंजे चालविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जाणार असल्याच्या चर्चेने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘नागपूर टुडे’च्या विशेष संवाद कार्यक्रमात पर्यावरणवादी अनुसया काळे, स्वतंत्र पत्रकार अंज्या अनापर्थी आणि प्रद्युम्न सहस्त्रभोजनी यांनी या प्रकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पर्यावरणवादी अनुसया काळे यांनी पिण्याचे पाणी कारंज्यासाठी वापरणे चुकीचेच नव्हे, तर नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप केला. नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसताना केवळ कारंजे चालविण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे कितपत योग्य, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Gold Rate
Sept 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,35,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“फुटाळा तलावाची अवस्था बिकट झाली आहे. तलावातून दुर्गंधी येत असताना त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र कारंजे सुरू करण्यासाठी मोठा खर्च केला जात आहे. हा प्रकल्प नागरिकांच्या पैशाचा अपव्यय ठरत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

स्वतंत्र पत्रकार अंज्या अनापर्थी यांनी फुटाळा फाउंटनसाठी मोठ्या व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली जात असल्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. पिण्याच्या पाण्याचा वापर मनोरंजनाच्या प्रकल्पासाठी करण्याऐवजी शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

फुटाळा हा केवळ मनोरंजनाचा केंद्रबिंदू नसून शहराच्या पर्यावरणीय आणि ऐतिहासिक वारशाचा भाग आहे. त्यामुळे तलावाचे नैसर्गिक स्वरूप जपणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि नागरिकांसाठी शांत, स्वच्छ परिसर निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, संवादात नागपूर शहराला मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जात असतानाही अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी कारंज्यासाठी वळविणे हा गंभीर विषय असून संबंधित यंत्रणांनी याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

फुटाळा फाउंटन प्रकल्पावर यापूर्वीही विविध कारणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रकल्पाची व्यवहार्यता, देखभाल, तलावाची स्वच्छता, खर्च आणि आवश्यक परवानग्या याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. फुटाळा हा वारसास्थळाचा दर्जा असलेला परिसर असल्याने कोणतेही काम करण्यापूर्वी संबंधित समित्या आणि सक्षम प्राधिकरणांच्या परवानग्यांचा विचार झाला आहे का? असा सवालही संवादादरम्यान उपस्थित करण्यात आला.

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी खरोखर कितपत उपयुक्त ठरला, याचे स्वतंत्र मूल्यमापन होण्याची गरज असल्याचे मत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले. त्यामुळे फुटाळा फाउंटनसाठी पिण्याचे पाणी वापरण्याच्या निर्णयावर प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे आणि तलावाच्या संवर्धनाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.