Published On : Fri, Aug 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिव्यांगाच्या साहित्य वाटप शिबीराच्या लाभार्थी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क साहित्य वाटप सोमवार १० रोजी
Advertisement

नागपूर: दिव्यांग, अंध, कर्णबधीरांना जयपूर फूटसह आवश्यक सहायक साहित्य देण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मनपाच्या सहकार्याने आज (ता.7) कविवर्य सुरेश भट सभागृह परिसरात लाभार्थीच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचा समारोप सोमवार १० रोजी सकाळी ९ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती निता ठाकरे उपस्थित राहतील.

नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, नागपूर जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व टाटा ट्रस्टने संयुक्तपणे हे शिबीर आयोजित केले आहे. जयपूर फूट तयार करण्याच्या मशीनचे पूजन अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम. यांनी केले. यावेळी भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे श्री. नारायण व्यास, समन्वयक श्री. सुबोध भंडारी उपस्थित होते. या शिबीरातील व्यवस्थेची पाहणी मुख्यमंत्री सचिवालय येथील सहसचिव श्रीमती आशा पठाण यांनी केली. यावेळी समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्निल लोखंडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर व श्री. अभिजीत राऊत उपस्थित होते. मनपाद्वारे शिबिरात येणाऱ्या दिव्यांग बांधवाना उत्तम सोयीसुविधा प्रदान केल्या जात आहेत. यावेळी एनसीसी, व एनएसएसचे स्वयंसेवक नागरिकांना सहकार्य करीत आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या काळात जयपूर फूट साहित्य, सहायक साधने मोजमाप व वाटप शिबीर कविवर्य सुरेश भट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केले आहे. शहरातील विविध भागातून आज सकाळपासून दिव्यांग व्यक्तींनी शिबीर स्थळी दाखल होऊन नोंदणी करण्यास सुरूवात केली. या शिबीरात दिव्यांगांना जयफूट फूट, व्हील चेअर, वॉकर, अपंगांना कॅलिपर, कुबड्या, कृत्रिम पाय, ट्रायसायकल, अंध व्यक्तींना ब्लाईंट स्टिक, कर्णबधिरांना श्रवण यंत्रांचे वाटप केले जाणार आहे. या सर्व लाभार्थींची नोंदणी सुरूवात करण्यात आली. विविध स्टॉल उभारण्यात आले आहे. या स्टॉलवर नोंदणी केली जात आहे. प्रत्येक प्रवर्गाच्या दिव्यांगासाठी वेगवेगळे नोंदणी स्टॉल उभारण्यात आले आहे. त्यानंतर मोजमाप व वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मनपाचे कर्मचारी व एनसीसीचे कॅडेट मदत करीत होते. नागपूर मनपाच्या समाज विकास विभागातर्फे लाभार्थींना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे. त्या प्रत्येक लाभार्थींची संबंधित स्टॉलवर नोंदणी केली.

Advertisement

जयपूर फूटचे वितरण

या शिबीरातून शहरातील दिव्यांगांना निःशुल्क जयपूर फूट मिळणार असल्याची माहिती भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे समन्वयक श्री. सुबोध भंडारी यांनी यावेळी दिली. गेल्या 50 वर्षांपासून जयपूरचे वाटप केले जात असून मनपाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील 3 हजारांवर दिव्यांगांना जयपूर देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या शिबीराचा फायदा शहरातील दिव्यांगांना होणार असल्याची माहिती श्री. भंडारी यांनी दिली.

जयपूर फूटसाठी मोजमाप

या शिबीरात जयपूर फूटसाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते. नोंदणीनंतर दिव्यांगांचे जयपूर फूटसाठी मोजमाप व तपासणी करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तींची तपासणी व मोजमापानंतर त्यांच्या मापाचे जयपूर फूट शिबीर स्थळी तयार करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना तात्काळ जयपूर फूट मिळत आहे.

लाभार्थ्यांकडून उपक्रमाचे कौतुक

यावेळी लाभार्थींनी या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. जयताळा भागातील कु. विद्या शरणागत दोन्ही पायांनी अधू आहे. या शिबीरात तिने नोंदणी केल्यानंतर म्हणाले, हा उपक्रम खूपच चांगला आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मनपाने यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याने कु. शरणागत हिने सांगितले.

राहुल कैथवास या तरुणाने व्हील चेअरसाठी नोंदणी केली आहे. या उपक्रमामुळे व्हील चेअर मिळणार आहे. यामुळे माझ्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. यामुळे शहरातील दिव्यांगांना सुद्धा फायदा होणार असल्याचे राहुल कैथवास यांनी सांगितले.

तुकडोजी पुतळा परिसरातील रहिवाशी असलेला श्री. देवेंद्र खडतकर यांनी या शिबीरात नोंदणी केली आहे. या शिबीरातून देवेंद्रला व्हील चेअर मिळणार आहे. मनपाचा हा उपक्रम चांगला असून शहरातील विविध दिव्यांगांना या शिबीरामुळे जीवन जगणे सुसह्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आवश्‌यक कागदपत्रे

या शिबीरात नोंदणी करण्यासाठी दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, 2 रंगीत पासपोर्ट छायाचित्रे आवश्यक आहे.

सोमवार १० रोजी समारोप

शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. या समारंभाला उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री श्री. आशीष जयस्वाल यांच्यासह खासदार श्रीमती माया इवनाते, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार श्री. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार श्री. संजय भेंडे, आमदार श्री. राजीव पोद्दार, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. विकास ठाकरे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. समीर मेघे, आमदार श्री. चरणसिंग ठाकूर, आमदार डॉ. आशीष देशमुख, आमदार श्री. संजय मेश्राम, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम. मुख्यमंत्री सचिवालय, सहासचिव श्रीमती आशा पठाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेता श्री. संजय महाकाळकर, धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, एमआयएमचे गटनेता शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता श्री. किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या श्रीमती आभा पांडे, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, शिवसेनेचे गटनेता श्री. गणेश चर्लेवार, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.