Published On : Sun, Dec 15th, 2019

अशोक ले-लँडचे राजेगावातील अतिक्रमण हटवावे, गावकऱ्यांची मागणी

Advertisement

नागपूर : अशोक ले-लँड कंपनीने भंडारा जिल्ह्यातील राजेगाव ग्रामपंचायतीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे. हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे या मागणीला घेऊन गावकऱ्यांनी सोमवारी विधानभवनावर मोर्चाही काढला होता.

गावकयांनी दिलेल्या माहितीनुसार राजेगावच्या २६ एकड जमिनीवर अशोक ले-लँडने अतिक्रमण केल्याचे शासनाने मान्य केले. यानंतर भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना २००७ ते २००९ दरम्यान निवेदने देऊन संबंधित अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली; परंतु याचा लाभ झाला नाही.

आता या प्रकरणात नवनियुक्त महाविकास आघाडीच्या शासनाने लक्ष घालून ही जागा राजेगाव ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.