Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; महाराष्ट्रासह देशातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे

Advertisement

मुंबई : देशातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी देशभरातील ५८ अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ९५० हून अधिक तांत्रिक अभ्यासक्रमही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत.

AICTE च्या अहवालानुसार, सर्वाधिक महाविद्यालये बंद झालेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. या दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांवर बंदची कारवाई करण्यात आली आहे. बंद झालेल्या ५८ संस्थांपैकी तीन महाविद्यालये सरकारी अनुदानित असून उर्वरित सर्व खासगी संस्थांचा समावेश आहे.

AICTE च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून विद्यार्थी प्रवेशात सातत्याने होत असलेली घट हे या निर्णयामागील प्रमुख कारण आहे. याशिवाय पात्र प्राध्यापकांची कमतरता, आवश्यक शैक्षणिक सुविधा व प्रयोगशाळांचा अभाव, तसेच नियामकांनी घालून दिलेल्या निकषांचे पालन न केल्यामुळे संबंधित संस्थांवर ही कारवाई करण्यात आली.

या निर्णयामुळे तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक निकषांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी शिक्षणाच्या बदलत्या मागणीचाही या निर्णयातून स्पष्ट संकेत मिळत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.