Published On : Fri, Sep 20th, 2019

ऊर्जा क्षेत्रात ११०० कोटींच्या विकास कामामुळे जिल्हा उर्जावान झाला – आमदार पारवे

Advertisement

नागपूर:-नागपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात ऊर्जा क्षेत्रात ११०० कोटी रुपयांची कामे झाल्याने जिल्हा उर्जावान झाला. असे गौरव उद्गार उमरेड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर पारवे यांनी आज येथे काढले.

महावितरणकडून उमरेड तालुक्यातील गंगापूर आणि शेडेश्वर येथे उभारण्यात ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्राचे लोकार्पण आमदार पारवे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणले की, महावितरणकडून जिल्ह्यात मागील ५ वर्षात अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या. एकट्या उमरेड विधानसभा मतदार संघात ९ वीज उपकेंद्र सुरु झाली आहेत. सोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज उपकेंद्राची कामे प्रगतीपथावर आहे. यामुळे आगामी काळात ग्रामीण भागातील जनतेला अखण्डित वीज पुरवठा मिळणे शक्य होणार आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उमरेड शहरासोबतच कुही आणि भिवापूर नगरपालिकेच्या हद्दीत भूमिगत वीज वाहिन्यांसाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना आमदार पारवे यांनी यावेळी उपस्थित महावितरण अधिकाऱ्यांना केली.

उमरेडमधील गंगापूर येथे सुरु करण्यात आलेल्या वीज उपकेंद्राचा सात हजार पेक्षा अधिक वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. नागपूर शहरातील खामला वीज उपकेंद्रानंतर गंगापूर वीज उपकेंद्र जीआईएस तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आल्याची माहिती महावितरण, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. व्यासपीठावर उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया, नगर परिषद उपाध्यक्षा अनुराधा कुलसुंगे, नागपूर जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, आनंदराव राऊत, जयकुमार वर्मा, डॉ. शिरीष मेश्राम, रुपचंद कडू, महावितरणचे अधीक्षक अभियंता(पायाभूत आराखडा) उमेश सहारे, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे उपस्थित होते. यानंतर आमदार पारवे यांच्या हस्ते शेडेश्वर येथील वीज उपकेंद्राचे देखील लोकार्पण करण्यात आले.

गंगापूर येथे येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रास एकात्मिक ऊर्जा विकास योजनेत तर शेडेश्वर येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रास दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत निधी मिळाला आहे.

Advertisement
Advertisement