Published On : Fri, May 25th, 2018

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करा : पालकमंत्री

Advertisement

kitadi meeting Bawankule

नागपुर/भंडारा: भाजपाच्या बुथ प्रमुखांनी व गावागावातील कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे व अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

साकोली विधानसभा मतदारसंघात किटाडी, पेंढरी व या भागातील प्रमख कार्यकर्त्यांच्या आणि बुथप्रमुखांच्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आ. बाळा काशीवार, सरपंच वंदना गवळे, तुळशीराम उसाही, कृष्णा जांभुळकर, धनंजय घाटबांधे, हरिभाऊ नंदनवार, लीलाधर चेटुले, मंगेश येवले, योगेश राणे, नागपूर जिल्ह्यातील भाजपाचे अरविंद गजभिये, किशोर रेवतकर, अविनाश खळतकर, संजय टेकाडे, अशोक धोटे आदी उपस्थित होते.

मतदारांनी सकाळी लवकर मतदान करावे. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर सतर्क राहणे आवश्यक आहे. पळपुट्यांना घरी पाठविण्यासाठी बुथप्रमुखांसाठी येत्या दोन दिवसांचा काळ हा महत्त्वाचा आहे. अधिक मतदान होईल यावर कार्यकर्त्यांनी भर देण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.

आ. बाळा काशीवार यांनीही बुथप्रमुखांना मार्गदर्शन केले. लहानशा गावात शंभरावर कार्यकर्ते आणि तरुण या बैठकीला उपस्थित होते.