Published On : Sun, Sep 29th, 2019

कन्हान च्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर अस्वच्छतेचे साम्राज्य

Advertisement

कन्हान : – शहरातील मुख्य चारपदरी सिमेंट राष्ट्रीय महामार्गावर दुभाजका करिता सोडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी जागेत मोठय़ा प्रमाणात कचरा व पाणी साचुन दुर्गंधी व मोकाट जनावरांचा धुमा कूळाने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने “स्वच्छ भारत अभियान ” विषयी नगरपरिषदेच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे ?

काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ कन्हान शहराच्या मध्य भागातुन जात असुन महामार्गाचे चारपदरी सिमेंट रस्ता बांधकाम निष्का ळजीने, अतिमंदगतीने सुरू अाहे. भविष्यात येणा-या मेट्रो रेल्वे करिता कांद्री पर्यंत चारपदरी सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी १० फिट रूंद खोलगट जागा सोडण्यात आली आहे. पोलीस स्टेशन ते नाका नं.७ पर्यंत रस्ता दुभाजक आता पर्यंत बनविण्यात आले नाही तसेच महामार्गावर एकही स्वच्छता गृह नसल्या ने बाहेरून येणा-या महिला पुरूषाना भंयकर त्रास सहन करावा लागतो.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धर्मराज शाळा कांद्री पासुन टेकाडी येथे नागपुर बॉयपास जोडरस्ता पर्यंत चारप दरी रस्ता दुभाजक बनवुन विधृत लाईट सुध्दा लावण्यात आले आहे. कन्हान-पिपरी ग्राम पंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होऊन पाच वर्षे होत असुन गल्ली ते दिल्ली पर्यंत सत्ता असताना सुध्दा कन्हान शहरातील आठवडी व गुजरी बाजाराकरिता जागेचा प्रश्न सोड विण्यात न आल्याने शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच आठवडी व गुजरी बाजार लागतो.

या दुकानदाराकडुन नगरपरिषद व्दारे बाजारपट्टी व स्वच्छते चे पैसे घेण्यात येते. रस्त्या लगत कचरा टाकण्याकरिता कचरा कुंडी किंवा जागा नसल्याने दुकानदार महामार्गाच्या मध्य भागी १० फुट खोल गट भागात कचरा टाकतात. मागील कित्येक दिवसा पासुन नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे व्यव स्थित काम नसल्याने कच-यांची नियमि त स्वच्छता होत नसल्याने डुकर, कुतरे, गाई, गोरे, मोकाट जनावरांचा धुमाकूळ वाढुन महामार्गावर अपघाताचे दररोज प्रमाण वाढुन निर्दोष दुचाकी, चारचाकी वाहन चालक व मोकाट जनावरांना दु़खा पत, अपंगत्व किंवा प्राण सुध्दा गमवावे लागत आहे.

तसेच पावसाचे पाणी महा मार्गाच्या मध्यभागाच्या खोलगट गड्डयात साचुन बरेच दिवस जमा असल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील मुख्य महामार्गावर कित्येक दिवस कचरा साचुन मोकाट जनावरांच्या धुमाकूळाने अस्वच्छतेचे साम्राज्य आहे तर शहरात स्वच्छता कशी असेल ? यास्तव ” स्वच्छ भारत अभियान ” भिंतीवर, फलकावर व कागदोपत्रीच दिसत असल्याने नगरपरि षद कन्हान-पिपरी शासन, प्रशासन व स्वच्छता विभागाच्या कार्य प्रणाली वर दररोज ये-जा करणारे प्रवाशी सह शहर वाशी संताप व्यकत करतानच्या चर्चा जोमाने रंगताना दिसत आहे.

.

कन्हान शहरातील महामार्गावरील रस्ता दुभाजक तातडीने बनविण्याची तसेच आठवडी व गुजरी बाजाराच्या जागेची नगरपरिषदेने त्वरित व्यवस्था करण्यात येऊन महामार्गालगत स्वच्छ ता गृहाचे निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Advertisement