पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम जोरात राबवा : पालकमंत्री

Advertisement

कामठी मतदारसंघाची महिला आघाडी-भाजयुमो बैठक

नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम जोरात राबवा. तसेच घरोघरी संपर्क करून शासनाच्या योजना आणि मतदारसंघात झालेली कामे लोकांना सांगा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.

भाजपा महाल कार्यालयात कामठी विधानसभा संघातील महिला आघाडी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, मनोज चवरे, योगेश वाडीभस्मे, किशोर रेवतकर, नरेश मोटघरे, संकेत बावनकुळे, राजेश गोल्हर, सुभाषभाऊ भात्रा आदी उपस्थित होते.

निवडणुकीचा प्रचार बंद होण्याच्या दिवसापर्यंत संपूर्ण कार्यक्रम या प्रमुखांना आखून देण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येकाने तो राबवायचा आहे. 37 क्लस्टरमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येईल. प्रत्येक बुथवर महिला आघाडीने 50 महिलांची बैठक घेण्याची सूचना करण्यात आी. 1 ते 3 तारखेपर्यंत महिलांनी प्रत्येक घरातील महिलांशी संपर्क करायचा आहे. घरोघरी प्रचार, मतदार यादीचे वाचन, आपापल्या बुथवर रॅली असा भरगच्च कार्यक्रम पक्षाने ठरवून दिला आहे. मतदारांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा आहे. मतदारसंघातील विविध समीकरणांचा अभ्यास करायचा आहे, याकडेही पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले