Published On : Wed, Jan 16th, 2019

इमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती

आशीनगर, धंतोली व हनुमान नगर झोनचा पाणीपुरवठा राहणार बाधित
इमर्जन्सी ब्रेकडाऊन काळात टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य नाही

नागपूर: महादुला येथील पंपिंग हाऊस परिसरात स्थित १४००मिमी व्यासाच्या पहिल्या टप्प्याच्या जलवाहिनीच्या जोडणीत मोठी गळती सुरु झालेली आहे.

Advertisement

मनपा-OCW यांनी या गळतीच्या दुरुस्तीचे काम १५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासुनच युद्धपातळीवर हाती घेतले आहे. गळती शोधण्याच्या कामावर कर्मचारी रुजू झालेले आहेत.

मात्र, तातडीचा उपाय म्हणून मनपा-OCW यांनी १६ जानेवारी २०१९ रोजी पहाटे ४ वाजतापासून नवेगाव-खैरी पंपिंग स्टेशन येथून पंपिंग पूर्णपणे बंद केले आहे. यामुळे पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र, गोधनी येथूनदेखील पंपिंग बंद झाले आहे.

या इमर्जन्सी ब्रेकडाऊनमुळे आशीनगर, धंतोली व हनुमान नगर झोनमधील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहण्याची शक्यता आहे.

बाधित भागांना पुढील ४८ तास मर्यादित व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

महादुला येथील दुरुस्तीच्या कामांना आणखी काही तासांचा अवधी लागणार असून १६ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement