Published On : Fri, Jan 31st, 2020

अवैधरित्या मद्यपिना सेवा देणाऱ्या हॉटेल्स वर छापे टाकून हॉटेल मालकासह 11 जणांना ताब्यात

रामटेक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नंदनवन पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या मद्यपिना सेवा देणाऱ्या हॉटेल्स वर छापे टाकून हॉटेल मालकासह 11 जणांना ताब्यात घेऊन रुपये 9000 किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. गुरुदेवनगर चौक, खर्बी रिंग रोड व जुना बागडगंज या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील ठिकाणी अवैधरित्या मद्यपिना सेवा दिली जाते व मद्यपी मद्यधुंद अवस्थेत राहून परिसरातील नागरिकांना त्रास देतात अशा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे *दुपारी 2 वाजता* छापे टाकून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत संदीप महादेवराव सहारे, राहुल अशोक खोब्रागडे, सुदर्शन वासुदेव गेडाम, नितेश विनायक पाटील, राकेश देवाजी वैद्य , कुणाल केवलराम मेश्राम, ज्ञानेश्वर सावन मेटांगले, गणेश मंगरूजी राऊत, मिलिंद दीनदयाळ रंगारी, नितीन विजयराव धोमने व मारुती जयदेव निनावे इत्यादी इसमांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून दिनांक 1/2/2020 रोजी मेहेरबान न्यायालयापुढे सूचना देण्यात आल्या आहेत.

सदरची कार्यवाही अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे, जवान राहुल पवार, निलेश पांडे, महिला जवान सोनाली खांडेकर व वाहन चालक रवी निकाळजे इत्यादींनी ही विशेष मोहीम पार पाडली.