Published On : Mon, Mar 8th, 2021

महिलांना वीज जोडणी, थकबाकी भरणाऱ्यांचा सन्मान


नागपूर: जागितक महिला दिनाचे औचित्य साधून महावितरणकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीज जोडणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या महिला वीज ग्राहकांना महिला जनमित्रांच्या हस्ते वीज जोडणी देण्यात आली. तसेच वीज देयकाची थकबाकी एकरकमी भरणाऱ्या महिला वीज ग्राहकांचा सत्कार करण्यात आला.

उमरेड येथे आयोजित कार्यक्रमास उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमंती राजलक्ष्मी भदोरिया तर मुख्य पाहुण्या म्हणून सुषमा राजू पारवे उपस्थित होत्या. यावेळी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी उपस्थित महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ उपस्थित होते. यावेळी कृषी पंपाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम भरणाऱ्या १० महिला वीज ग्राहकांचा सत्कार करण्यात आला.

मनसर ग्रामपंचायत येथे महावितरण रामटेक तर्फे महा कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात पोलीस उप अधीक्षक श्रीमती नयन अलोरकर, सरपंच ग्राम पंचायत मनसर जोगेश्वरी चोखान्द्रे व अन्य महिला ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते .सदर कार्यक्रमात कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत सलेली विविध योजनेची माहिती देण्यात आली .

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नरखेड पंचायत समिती येथे महा कृषि ऊर्जा पर्वा निमित्ताने महिलांना कृषी योजनेचे महत्त्व सांगितले तसेच महिला बचत गट या योजनेतून वीज बिल वसुलीतुन बचत गट आपले उत्पन्न मिळवू शकतात या बद्दल महावितरणकडून मार्गदर्शन करण्यात आले.

पंचायत समिती कुही येथे महिला दिनाचे औचित्य साधुन १००% कृषी वीज बिल भरलेल्या महिला वीज ग्राहकाचे कुही पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे यांचे हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित आले. महावितरण सावरगाव उपविभागाकडून आयोजित कार्यक्रमात सरपंच प्रगती ढोणे यांच्या उपस्थित कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत असलेली विविध योजनेची माहिती देण्यात आली . नागपूर महानगर पालिकेच्या गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्धा पथक यांनी तुळशीबाग उपविभाग कार्यालयात जाऊन महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

Advertisement
Advertisement