नागपूर: नागपूर महानगरपालिकेचा कार्यभार सुरळीत होण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या १० विशेष समित्यांची निवडणूक बुधवार ३० मार्चला दुपारी ३ वाजता मनपा मुख्यालयात होणार आहे.
नागपूर महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या १० झोननिहाय सभापातींपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी नामाकंन अर्ज दाखल करण्यात आले. ही निवडणूक ३० मार्चला सकाळी१० वाजता संबधित झोन कार्यलयात होणार आहे. महापालिकेसाठी शासनाने नियुक्त केलेल्या १० विशेष समिती सभापती निवड यंदा निवडणूक पद्धतीने होणार आहे. पूर्वी ही निवड निवडप्रक्रियेद्वारे घोषित होत असे. परंतु शासनाच्या नव्या नियमानुसार आता निवडणूक पद्धतीने निवड होत आहे.
भाजपाच्या वतीने लक्ष्मीनगर झोन सभापतीपदासाठी प्रकाश भोयर, धरमपेठ झोनसाठी रुपा राय, हनुमाननगर झोनसाठी भगवान शेंडे, धंतोली झोनसाठी प्रमोद चिखले, नेहरूनगर झोनसाठी नेहा साकोरे, गांधीबाग झोनसाठी सुमेधा देशपांडे, सतरंजीपुरा झोनसाठी संजय चावरे, लकडगंज झोनसाठी दीपक वाडीभस्मे, आसीनगर झोनसाठी भाग्यश्री कानतोडे, मंगळवारी झोनसाठी सुषमा चौधरी यांनी नामाकंन अर्ज दाखल केले आहेत.
