बेसा-बेलतरोडी नगर परिषद करण्यासाठी भाजपाला निवडून द्या : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

नागपूर: बेसा-बेलतरोडी नगर परिषद करण्यासाठी कमळ चिन्हावरील भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्या. एकही मत काँग्रेसकडे जाऊ देऊ नका, अन्यथा 25 हा भाग 25 वर्षे मागे गेल्याशिवाय राहाणार नाही, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बेसा बेलतरोडी येथील प्रचारसभेत केले.

कामठी विधानसभेचे भाजपा-शिवसेना, बरिएमं, रिपाई महायुतीचे उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. याप्रसंगी उमेदवार टेकचंद सावरकर, अजय बोढारे, सुरेंद्र बानाईत, संकेत बावनकुळे, संजय भोयर, हरीश कंगाले, मुकेश काळे, जितू चांदूरकर, तसेच पिपळा येथे डीडी सोनटक्के, नगरसेवक भगवान मेंढे, नरेश भोयर, प्रीती मानमोडे, प्रभू येंडे, सचिन घोडे, श्रीमती हाथीबेड, श्रीमती धांडे, वैशाली भोयर, अनिता कावळे, कैलास सावरकर आदी उपस्थित होते.

राज्यात पुन्हा आपले सरकार येणार आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे विकास कामांबाबत आपण मागे राहणार नाही. आजपर्यंत शक्य तेवढा जास्तीत जास्त विकासाच्या योजना या भागात आपण आणल्या. पुढेही आणखी आणणार आहोत. आपले सरकार राहणार असल्यामुळे निधी कमी पडणार नाही. भीषण पाणीटंचाई असलेल्या या भागात पेरीअर्बन पाणीपुरवठा योजनेमुळे पाणीटंचाई संपली आहे. ही सर्व कामे करण्यासाठी भाजपाचा आमदार येणे आवश्यक आहे. बेसा बेलतरोडी नगर परिषद झाल्यानंतर आपली घरे अधिकृत करता येणार आहे.

यासाठ़ीच एकेका घरापर्यंत पोहोचा. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करा आणि 75 टक्केपेक्षा अधिक मतदान झाले पाहिजे यासाठ़ी मेहनत घ्या. मी याच मतदारसंघात राहाणार आहे. हा मतदारसंघ मी दत्तक घेतला आहे. एकही मत काँग्रेसकडे जाणार नाही याची काळजी घेत टेकचंद सावरकर यांना निवडून आणण्याचे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

यावेळी उमेदवार टेकचंद सावरकर यांनीही उपस्थित जनतेला निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे यांचेही यावेळी भाषण झाले.