Published On : Mon, Apr 15th, 2019

योगी आदित्यनाथ, मायावतींना प्रचारापासून रोखले, निवडणूक आयोगाची कारवाई

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अखेर कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार करण्यावर तीन दिवसांची तर मायावती यांच्या प्रचार करण्यावर दोन दिवसांची बंदी घातली आहे.

उद्या म्हणजे १६ एप्रिल सकाळी सहा वाजल्यापासून बंदीचा कालावधी सुरु होणार आहे. निवडणूक प्रचारात दोघांनी केलेल्या वक्तव्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.