महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटासाठी (Shinde Group) नावं जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे. तर शिंदे गटाने सुचवलेल्या नावांपैकी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे दोन्ही गट येथून पुढे याच नावाने ओळखले जातील आणि याच नावाने ते निवडणुकीला समोरे जाणार आहेत.
ठाकरे गटाला मिळाले हे चिन्ह
दरम्यान निवडणूक आयोगाकडे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी तीन-तीन निवडणूक चिन्हांची शिफारस केली होती. त्यापैकी उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे, तर शिंदे गटाला चिन्हासाठी इतर पर्याय सुचवावे लागणार आहेत. कारण शिंदे गटाने दिलेल्या तीन पैर्यायांपैकी कोणतेही चिन्ह आयोगाने मंजूर केले नाही.